श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

ताज़ा खबर

21-01-2016

'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा परिचय मेळावा उत्साहातभय्यू महाराज करीत आहे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील 

'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा सामुहिक विवाह 


अकोला : एच.आय.व्ही. ग्रस्त तरुण-तरुणींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याच्या दृष्टीने येथील सूर्योदय बालगृह येथे १६ जानेवारी रोजी एच.आय.व्ही. सह जीवन जगणार्‍या मुला-मुलींचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा पार पडला. युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह, मलकापूर व नेटवर्क ऑफ अकोला ए. आर. टी. सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील दुर्लक्षित घटकांना एकत्रित करून त्यांना सहजीवनाची एक नवीन दिशा मिळावी, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर विनोद मापारी, तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल जाधव, बालगृहाच्या संचालिका प्रतिभा देशमुख व गौतम ढाले यांची उपस्थिती होती.  इंदोर येथून आलेले संस्थे चे ट्रस्टी तुषार पाटील यांनी सांगितले कि भय्यू जी महाराज यांच्या द्वारे भारतातील पहिला 

'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा सामुहिक विवाह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर हि राज्यातून 'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलीं विवाहात सामिलीत होणार आहेत.

 


© 2018 All Right Reserved