श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

संघर्षानेच दुष्काळातून बाहेर पडणे शक्‍य - भय्यूजी महाराज 11-10-2015

राष्ट्रसंत भय्यू महाराजकेज - अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी संवाद यात्रा

 

बीडदि. 11  निसर्गचक्र बदलत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजेपारंपारिक पिकांऐवजी ज्याचे उत्पन्न चांगले किंवा बाजारभाव आहे अशी पिकेघेतली पाहिजेतनिसर्ग परीक्षा घेत असताना या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहेशेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडेही पाठपुरावाकरणार असल्याचे राष्ट्रसंत भय्यू महाराज म्हणाले.

दुष्काळी पार्श्वभूमीवर शनिवारी दि. 10 भय्यू महाराज यांनी केज तालुक्यातील  अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी संवाद यात्रा काढलीयावेळी अक्षय मुंदडाविलासथोरातअर्जुन वाघमारेगणेश वडवणकररोहित देशमुख उपस्थित होतेकुंबेफळ  लोखंडीसावरगाववाघाळा येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलातरचतुरवाडी येथे आत्महत्याग्रस् शेतकरी कुटूंबाची भेट घेतलीभय्यू महाराज म्हणालेमागच्या वर्षी अवकाळी पावसाने पिके गेलीतर यंदा कमी पावसाने पिकेआलीच नाहीतपाऊस पुरेसा पडला तरी पावसाळाभर पडत नसल्याने त्याचा उपयोग होत नाहीत्यामुळे शेतकऱ्यांनी आता निसर्गाची लहर लक्षात घेऊन बदलकेला पाहिजेसर्व उत्पादनांना हमी भाव असतोत्याप्रमाणे शेती पिकांना मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले

यावेळी सुर्योदय परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमासाठी कुंबेफळ ग्रामस्थांनी भय्यू महाराज यांच्याकडे शैक्षणिक साहित् सुपूर्द केले


© 2018 All Right Reserved