श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

नियतिने वाऱ्यावर सोडलेल्या चिमुकल्यांना भैय्यु महाराजांनी दिली मायेची उब 18-03-2016

उस्मानाबाद : राठवाड्यातील उस्मानाबाद व सोलापूर आणि  कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील बोळेगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटंसं शेवटचं गाव. तेथील दलित कुटुंबातील सौ. अनुसया अंगद कांबळे व तिचे पती अंगद भीमा कांबळे या दाम्पत्याने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केली. दोन एकर शेत तेही वडील भीमा कांबळेच्या नावाने, तीन वर्षाचा सततचा दुष्काळ, त्यामुळे शेती पिकली नाही, हाताला काम नाही, घरात धान्य नाही. मुलांना नवर्याला घरात असेल ते खाऊ घालून सतत तीन दिवस अनुसया उपाशी होती. उद्या मुलांना व  नवऱ्याला काय खाऊ घालायचे या विवंचनेत अनुसयाने रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेटऊन घेतले व उपचारादरम्यान तिने हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्याचा धक्का अंगद सहन करू शकला नाही. आपण चार मुलांना जन्म दिला, बायको मुलांना सांभाळायला असमर्थ ठरलो या मानसिक ताणाखाली बायकोच्या नंतर ११ दिवसाने
अंगदने  अक्कलकोटच्या बसस्थानकावर  विष पिऊन मृत्यूला कवटाळले. त्या दाम्पत्यांची २ मुलं व २ मुली अनुक्रमे
१) कु. पल्लवी अंगद कांबळे वय वर्ष ८ इ ३ री
२) कु अदिती अंगद कांबळे वय वर्ष ६  इ १ ली
३) कु सोहम अंगद कांबळे वय वर्ष ४  अंगणवाडी
४) कु रोनक अंगद कांबळे वय वर्ष २.
हि  उघड्यावर पडली. याबाबत सविस्तर वृत्त उस्मानाबाद येथील पत्रकार श्री सुनील ढेपे यांनी सोशिअल मिडिया उस्मानाबाद लाईव वरून चालवले. हि बातमी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांना समजली, त्यांनी त्वरित त्या  चारही मुलांचे  शिक्षण-संगोपन व पुनर्वसन करण्यासाठीचा संस्थेचा मनोदय व्यक्त
केला. तसेच त्यांन्ना दत्तक घेण्याचे जाहीर केले. व संबंधित मुलांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांचे सहकारी कैलास चिनगुंडे यांच्याकरवी निरोप पोहचवला. नातेवाईकांच्या सहमतीनंतर मुलं त्वरित संस्थेत आणण्यात येतील असे भैय्यू महाराज यांनी सांगितले.

सादर प्रकाशनार्थ

© 2018 All Right Reserved