श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

कोपर्डी घटनेने व्यथित झालेल्या भैय्यु महाराजांचा निर्णय - सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजना 20-07-2016

सुविधेनंतर 'सूर्योदय'कडून मुलींना आता सुरक्षितताही - कोपर्डी घटनेने व्यथित झालेल्या भैय्यु महाराजांचा निर्णय - सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजना - शालेय विद्यार्थीनींसाठी सिसिटीव्ही आणि महिला वाहक असलेल्या बस - शाळांमध्ये राबवणार संस्कार अभियान सप्ताह कोपर्डीतल्या शालेय विद्यार्थिनींनी घाबरून शिक्षण सोडु नए यासाठी भय्यू महाराज यांनी घेतला पुढाकार... मुलींच्या सुरक्षित शालेय वाहतूक व्यवस्थेची घेतली जबाबदारी... *अत्याधुनिक सुरक्षा सुविधायुक्त 4 स्कूल बसेस देणार... *निर्भयाची आई असेल या व्यवस्था समितीची अध्यक्ष.... * महिला ड्राईवर आणि कंडक्टर * बसमध्ये CCTV, वीडियो रेकॉर्डर, लोकेशन ट्रैकर * पिक अप ड्रॉप करता याव यासाठी पालकांना अलर्ट मेसेज सिस्टम * अटेंडेंट रिकॉर्डिंग, बायो मेट्रिक मशीन, लायब्ररी सुविधाही *स्थानिक ग्रामवासीची सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेची समिती मध्ये ६ स्थानिक महिला व ५ शुजन्य पुरुष मंडळींचा सहभाग. * योजनेचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामवासीयांकडे व्यवस्थापन * योजनेचा संपूर्ण खर्च भैय्यूजी महाराजांची संस्था करणार. *समाजात अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सूर्योदय संस्कार अभियानाचा प्रारंभ. अशा घटनांपासून घाबरून न मुलींना मानसिक बळ मिळावे यासाठी सूर्यादय कुहू कन्याधन सुरक्षा योजना। अहमदनगर, ता. 20 : मानवतेचा महाकुंभ अंतर्गत दुष्काळ मुक्त मराठवाडा अभियानातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळांमध्ये जायला पायपीट करावी लागू नये म्हणून राष्ट्रसंत भैय्यु महाराज प्रणित सूर्योदय परिवाराने सायकली भेट दिल्या. पण, परवा, कोपर्डी जि. अहमदनगर येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. सारे राज्य यामुळे हादरून गेले आहे. राज्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल आहेत. या विषयाकडे सर्वच पक्ष राजकीय नजरेने पाहत आहेत. मात्र या घटनेमुळे कोपर्डी भागातील आणि राज्यातील अनेक भागांतील मुली भीतीपोटी शाळांमध्ये जात नसल्याचे समोर आले आहे. स्वतः भैय्यु महाराज हि घटना समजल्यानंतर प्रचंड अस्वस्थ आहेत. जर असा प्रकार दुर्दैवाने आपल्याच मुलीच्या बाबतीत घडला असता तर या दृष्टिकोनातून सर्वांनि याकडे पाहण्याची गरज असल्याची त्यांची भावना आहे. या घटनेचे राज्यभर उमटत असलेले पडसाद, त्याचा होणार खल आणि भविष्यात या खटल्यात न्यायालय जो निर्णय देईल ते सर्व फक्त या घटनेशी निगडित असेल. पण , या घटनेमुळे संबंध स्त्री वर्ग, मुली घाबरून गेल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींना शाळेसाठी पायपीट करत परगावी जावे लागते. त्या मुली या घटनेनंतर घराबाहेर पडत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपायाच्या दृष्टीने पावले उचलली जावीत असे भैय्यु महाराजांची भावना आणि आवाहन आहे. त्यामुळे या अभियानाची सुरुवात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सूर्योदय परिवाराकडून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवता म्हाकुंभाच्या दुष्काळमुक्त मराठवाडा अभियानातून शालेय विद्यार्थिनींना दूरच्या गावी शाळेला जाता यावे यासाठी सायकली दिल्या जात आहेत. आता यात पुढचे पाऊल टाकत भैय्यु महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या नावाने 'सूर्योदय कुहू कन्याधन योजना' सुरु केली आहे. यामधून सीसीटीवी कॅमेरे असलेल्या चार बस दिल्या जाणार आहेत. या बुसच्या वाहक महिलाच असतील. कोपर्डी भागात 2 आणि बीड जिल्ह्यात 2 अशा 4 बस दिल्या जाणार आहेत. शालेय मुलींना मोफत घरून शाळेत आणि शाळेतून घरी आणून सोडले जाईल. पूर्वी सायकल देऊन सूर्योदय परिवाराने शालेय मुलींना सुविधा दिली होती आता सुविधा आणि सुरक्षाही मिळणार आहे. यापूर्वी डॉ श्री. भींय्यूजी महाराजांच्या संस्थेने १२ लाख हून अधिक विध्यार्थाना शिष्यवृत्तीचे वाटप केले, २५ लाख विद्यार्थ्यांची संविधान परीक्षांचे आयोजन केले. ------ शाळांमध्ये राबवणार संस्कार अभियान ----- अशा घटना रोखण्यासाठी जसा कडक कायदा गरजेचा आहे तसा सामाजिक बदल आणि संस्कार रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्योदय परिवार राज्यातील शाळांमध्ये संस्कारवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी संस्कार अभियान राबवणार आहे. सादर प्रकाशनार्थ श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट, इंदौर

© 2017 All Right Reserved