श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

भय्यूजी महाराज प्रणित सूर्योदय परिवारा कडून विद्यार्थिनींच्या सुरक्षितते साठी सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेची सुरुआत   22-07-2016

प्रेस विज्ञप्ति

भय्यूजी महाराज प्रणित सूर्योदय परिवारा कडून विद्यार्थिनींच्या सुरक्षितते साठी सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेची सुरुआत  

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे द्वारा कोपर्डी येथील मुलीसाठी ४ आधुनिक तंत्रज्ञान युक्त स्कूल बसचे लोकार्पण 

निर्भयासाठी सरसावले भैय्यूजी महाराज. 
अहमदनगर दि. २२  परवा, कोपर्डी जि. अहमदनगर येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. सारे राज्य यामुळे हादरून गेले आहे. राज्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल आहेत. या विषयाकडे सर्वच पक्ष राजकीय नजरेने पाहत आहेत.  मात्र या घटनेमुळे कोपर्डी भागातील आणि राज्यातील अनेक भागांतील मुली भीतीपोटी शाळांमध्ये जात नसल्याचे समोर आले आहे. स्वतः भैय्युजी महाराज हि घटना समजल्यानंतर प्रचंड अस्वस्थ आहेत. जर असा प्रकार दुर्दैवाने आपल्याच मुलीच्या बाबतीत घडला असता तर या दृष्टिकोनातून सर्वांनि याकडे पाहण्याची गरज असल्याची त्यांची भावना आहे. या घटनेचे राज्यभर उमटत असलेले पडसाद, त्याचा होणार खल आणि भविष्यात या खटल्यात न्यायालय जो निर्णय देईल ते सर्व फक्त या घटनेशी निगडित असेल. पण , या घटनेमुळे संबंध स्त्री वर्ग, मुली घाबरून गेल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींना शाळेसाठी पायपीट करत परगावी जावे लागते. त्या मुली या घटनेनंतर घराबाहेर पडत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपायाच्या दृष्टीने पावले उचलली जावीत असे भैय्यु महाराजांची भावना आणि आवाहन आहे.
त्यामुळे या अभियानाची सुरुवात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सूर्योदय परिवाराकडून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवता म्हाकुंभाच्या दुष्काळमुक्त मराठवाडा अभियानातून शालेय विद्यार्थिनींना दूरच्या गावी शाळेला जाता यावे यासाठी भैय्यूजी महाराजांची संस्थे मार्फत सायकली दिल्या जात आहेत. आता यात पुढचे पाऊल टाकत भैय्यु महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या नावाने 'सूर्योदय कुहू कन्याधन योजना' सुरु केली आहे. यामधून सीसीटीवी कॅमेरे असलेल्या चार बस दिल्या आहेत. या बसच्या वाहक महिलाच असतील आणि कंडक्टर सुद्धा महिलाच असणार आहेत. कोपर्डी भागात 2 आणि बीड जिल्ह्यात 2 अशा 4 बस दिल्या आहेत. शालेय मुलींना मोफत घरून शाळेत आणि शाळेतून घरी आणून सोडले जाईल. पूर्वी सायकल देऊन सूर्योदय परिवाराने शालेय मुलींना सुविधा  दिली होती आता सुविधा आणि सुरक्षाही मिळणार आहे.  

 

भैय्यूजी महाराजांनी निर्भयाच्या नूतन माध्यमिक विद्यालय कुळ्धरण ता.कर्जत.जि. अहमदनगर मध्ये स्वतः जावून तेथील मुख्याधापक व शिक्षक मडळीशी संवाद साधला.
 भैय्यूजी महाराजांच्या संस्थे मार्फत स्थानिक ग्रामवासीची सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेची समिती गठीत करण्यात आली आहे. 
 त्या  मध्ये ६ स्थानिक महिला व ५ जवाबदार पुरुष मंडळींचा सहभाग राहणार आहे. निर्भयाची आई सौ.रेखा बबन मुद्रिक या व्यवस्था समितीची अध्यक्ष राहणार आहे.समितीची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) सौ.रेखा बबन मुद्रिक २) सौ. रोहिणी सूर्यभान मुद्रिक ३) सौ.मुक्त विजय मुद्रिक ४) सौ. राजश्री सचिन मुद्रिक ५) सौ.सिमाबाई सचिन मुद्रिक ६) सौ. आशाबाई विभीषण मुद्रिक     ७) प्राचार्य नमन मराठी विद्यालय ८) प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल - महामुनी सर  ९) सतीश महादेव मुद्रिक
१०) समीर दतात्रय जामाप  ११) लक्ष्मण मोहन मुद्रिक
यापूर्वी डॉ श्री. भींय्यूजी महाराजांच्या संस्थेने १२ लाख हून अधिक विद्यार्थिना  शिष्यवृत्तीचे वाटप केले, २५ लाख  विद्यार्थ्यांची संविधान परीक्षांचे आयोजन केले.
 
शाळांमध्ये राबवणार संस्कार अभियान
अशा घटना रोखण्यासाठी जसा कडक कायदा गरजेचा आहे तसा सामाजिक बदल आणि संस्कार रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्योदय परिवार राज्यातील  शाळांमध्ये संस्कारवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी संस्कार अभियान राबवणार आहे. या अभियानाची सुरवात आज कोपर्डीगावातुन करण्यात आली आहे.
  
कोपर्डीतल्या शालेय विद्यार्थिनींनी घाबरून शिक्षण सोडु नए यासाठी भय्यू महाराज यांनी पुढाकार घेतला... मुलींच्या सुरक्षित शालेय वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.

* अत्याधुनिक सुरक्षा सुविधायुक्त 4 स्कूल बसेस दिल्यात.
*निर्भयाची आई आई या व्यवस्था समितीची अध्यक्ष आहे. 
* बसवर केवळ महिला ड्राईवर आणि कंडक्टर आहेत.
* बसमध्ये CCTV, वीडियो रेकॉर्डर, लोकेशन ट्रैकरची व्यवस्था आहे.
* पिक अप ड्रॉप करता याव यासाठी पालकांना अलर्ट मेसेज सिस्टम आहे. 
* अटेंडेंट रिकॉर्डिंग, बायो मेट्रिक मशीन, लायब्ररी सुविधाही सुद्धा आहे.
* स्थानिक ग्रामवासीची  सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेची समिती मध्ये ६ स्थानिक महिला व ५ शुजन्य पुरुष मंडळींचा सहभाग आहे.
* योजनेचे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक ग्रामवासीयांकडेच देण्यात आले आहे.
* योजनेचा संपूर्ण खर्च भैय्यूजी महाराजांची संस्था करत आहे.
* समाजात अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सूर्योदय संस्कार अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.


सादर प्रकाशनार्थ  

 

© 2018 All Right Reserved